December 10, 2016

G K Olympiad preparation in Marathi Part 1 जी के ऑलिम्पियाड

G K Olympiad preparation in Marathi Part 1 जी के ऑलिम्पियाड


राज्यस्तरीय जनरल नॉलेज स्पर्धा 

नॉलेज अवर्स इंटरनॅशनल 

जी के ऑलिम्पियाड

मुलांमध्ये जनरल नॉलेजची आवड निर्माण करणारा एक अभिनव

 जनरल नॉलेज हाच जीवनाचा खरा दागिणा होय !

योग्य वेळचा अभ्यास नेहमी प्रगती पथाकडे नेतो !

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी मराठी म्हणी भाग १.

 सर्व  प्रकारच्या स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी मराठी  म्हणी भाग १. 


                                                                                  मराठी म्हणी ह्या स्पर्धा परीक्षेचा प्राण समजल्या जातात.  
          कोणतीही स्पर्धा परीक्षा मराठी भाषेचा वापर करून देण्याकरिता मराठी म्हणी अत्यंत महत्वाच्या ठरतात.  महाराष्ट्र राज्याची राज्य भाषा हि मराठी म्हणून मान्य करण्यात आली असून. आपल्या राज्यात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा या प्रामुख्याने मराठी भाषेचा वापर करून घेतल्या जातात त्यामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. 

October 6, 2016

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 3

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 3

   आंगनवाडी मधे शिकणाऱ्या ३ ते ४ वर्षाच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्या व कोणत्या पद्धतीने हे पालकांनी पहावे मि या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी सांगत आहे पहा वइतरांना सांगा. या व्हिडीओ मध्ये मुलांना उभ्या रेषा, अवाढव्य रेषा, तिरप्या रेषा, गोल, अर्ध गोल काढायला शिकवले आहे. चिन्हांचा सराव १ महिना घ्या. व नंतर मराठी अ, A, १, 1 अक्षरे बनवायला शिकवा ती कशी ते व्हिडिओ मध्ये पहा . मराठी, इंग्लिश शब्द, आकडे तयार करणे मुलांना व्हिडीओ दाखवा व त्याची चांगली तयारी करून घ्या. गडबड करू नये या गोष्टी सरावाने मुलांना जमत असतात. त्याच्याकडून ज्यास्त शिकण्याची अपेक्षा करू नका. युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद !

September 1, 2016

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग 2

 
  

     आंगनवाडी मधे शिकणाऱ्या ३ ते ४ वर्षाच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्या व कोणत्या पद्धतीने हे पालकांनी पहावे मि या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी सांगत आहे पहा व इतरांना सांगा.


       या व्हिडीओ मध्ये मुलांना गोल, अर्ध गोल काढायला शिकवले आहे. या चिन्हाचा वापर पुढे मराठी, इंग्लिश शब्द, आकडे तयार करणे लिहिणे यासाठी होतो. मुलांना व्हिडीओ दाखवा व त्याची चांगली तयारी करून घ्या. गडबड करू नये या गोष्टी सरावाने मुलांना जमत असतात. त्याच्याकडून ज्यास्त शिकण्याची अपेक्षा करू नका.


युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद !

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग १

लहान मुलांना काय शिकवावे कसे शिकवावे? भाग १

   
           आंगनवाडी मधे शिकणाऱ्या ३ ते ४ वर्षाच्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवाव्या व कोणत्या पद्धतीने हे पालकांनी पहावे मि या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी सांगत आहे पहा व इतरांना सांगा . 

     आंगणवाडी ३ ते ४ वर्ष वयाच्या मुलांना आपली मातृभाष्या बोलायला शिकवा. त्याचा शब्ध साठा वाढवा. त्यानंतर त्याला उभ्या रेषा, अवाढव्य रेषा, तिरप्या रेषा काढायला शिकवा.
     अश्या रेषा त्याला ८ ते १० दिवस काढायाला द्या नंतर पुढचा पाठ पहा. 

युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद


August 27, 2016

तांदळाचे उक्कड कानवले बनवने.

तांदळाचे उक्कड कानवले बनवने


                                                                      
    तांदळाचे उक्कड कानवले कसे बनवतात ते पाहू.       साहित्य :-
               १) तांदळाचे बारीक पीठ ४ वाट्या.
               २) ओल्या खोबऱ्याचा खिस २ वाट्या. 
               ३) साखर १ वाटी. 
               ४) १ चमचा मीठ. 
               ५) वेलदोडे ४,५ बारीक करून.
               ६) सुंठ पावडर १ चमचा.
               ७) तूप १ चमचा.
               ८) तेल १ चमचा.
              ९) दोन लीटर पाणी.
             १०) परात, कढई, उक्कड चाळन, पातेले इ.
कृती :-

प्रथम सारण तयार करू गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये एक चमचा तुप टाका व नंतर खोबऱ्याचा खिस घालून चांगले परतून घ्या. रंग बदलायला सुरूवात झालेनंतर त्यामधे एक वाटी साखर, मीठ व वेलदोडा, सुंठ पावडर टाकुन घ्या. चांगले एकजीव करा व गॅसवरून खाली उतरवा. हे कानवलेमध्ये भरण्यासाठी सारण तयार झाले.

आता कानवले बनवण्यासाठी पिठ तयार करण्याची पध्दत. प्रथम एक तांब्या ६०० मिली अंदाजे पाणी एका पातेल्यामधे ऊकळावे त्यामधे तांदळाचे पीठ घालून पळीने हालवत रहा त्यामधे गुटळ्या होऊ देवू नयेत. पीठ घट्ट होत आलेनंतर त्यावरती झाकन ठेवून ५ मिनीट वाफ द्या. नंतर पसरट भांड्यामधे थोडे थोडे शिजवलेले पिठ घेऊन हातााला थोडे तेल लावून पिठ चांगले मळून घ्या.
(आधिक माहीतीकरीता हे व्हिडीओ पहा) पिठ मळून झालेनंतर त्याच्या छोट्या गोळया करून हातावरती पसरवा व्हिडीओमधे दाखवल्या प्रमाणे व त्यामधे बनवलेले सारन भरून बंद करा. अश्या पध्दतीने कानवले बनवून घ्या.

नंतर ऊक्कड चाळन बसणा-या पातेल्यामधे पाणी ऊकळत ठेवा व चाळनीमधे बनवलेले कानवले ऊकडत ठेवा ऊक्कडल्यानंतर काढुन घ्या.हाा पदार्थ एक दिवसापेक्षा ज्यास्त वेळ टिकत नाही. आपल्या आवश्यकतेनुसार बनवा.


वयस्कर व दात नसलेल्या विक्ती व ज्यांना मेदाचा त्रास आहे. अशा व्यक्तीना लाभदायक पचनास हलका आहे.


आवश्य करून पहा.


युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद!

August 10, 2016

महाराष्ट्र राज्यातील भात पेरणी भाग 2

भारतातील महाराष्ट्र राज्यातील पूर्व कोकण भाग सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी करतात त्यानंतर त्याला पाणी देण्याच्या पद्धती . 

       धूळवाफ भाताची पेरणी झालेनंतर पाऊस लवकर किंव्हा पुरेसा न पडल्यास त्या जमिनीला पाणी देणे भाग पडते. अन्यथा बी खराब होण्याची शक्यता असते.                                                                   त्यामुळे भाताला पाणी देण्याच्या तीन पद्धती याठिकाणी वापरल्या आहेत.                             १) पाणी वाफ्यात सोडून देऊन.                              २) स्पिंकलर चा वापर करून.                                ३) ठिबक सिंचन चा वापर .                                                आम्ही प्रथम पाणी वाफ्यामध्ये सोडून पहिले मात्र यामध्ये असे आढळून आले कि पाणी ज्यास्त प्रमाणात उपलब्ध असायला हवे. त्याचप्रमाणे पाणी पाजताना जमिनीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरत नाही. वाफे पाण्याने भरण्याकरता पाणी ज्यास्त प्रमाणात हवे. तेवढे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध होत नाही. व पाणी जमिनीवर छोटे छोटे पाठ काढून पाजावे लागते. त्यामुळे भात वर येण्याची व गोळा होण्याची शक्यता असते . 
         मग त्यावर पर्याय म्हणून आम्ही स्पिंकलर वापरून पहिले त्याकरिताही पाणी थोडे ज्यास्तच लागते.  म्हणून शेवटी आम्ही ठिबक वापरले त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे झालेला आम्हाला जाणवला आहे .  ठिबकच्या पाईप १ फूट अंतरावर लावल्या आहेत. 

            भात उगवण्यासाठी ४ते ५ इंच खोल जमिनीला ओल पोहचणे आवश्यक असते . १ एकर शेतामध्ये ठिबक लावल्यास ५ एच. पी. मोटर ८ ते १० तास चालवल्यास पुरेशी ओल होते. 

                वरील ठिबक पद्धतीने भाताला पाणी देऊन पहा मला आपल्या प्रतिक्रया कळवा. युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.

धन्यवाद !
                                                     

August 8, 2016

How to Make Home-Baked (Bhakari) Constitute?

How to Make Home-Baked (Bhakari) Constitute?


     2 भाकरी करण्यासाठी साहित्य
 १) ज्वारी, बाजरी, मक्का, तांदूळ यापैकी एकाचे               बारीक दळलेले पीठ ३ वाट्या
 २) गरम पाणी (उत्तवण्यासाटी )
 ३) थंड पाणी एका भांड्यतून
 ४) परात
 ५) तवा इ.

 कृती :-
  प्रथम परातीमध्ये 2 वाट्या पीठ घ्या. पीठ दळून आणून फार दिवस झाले असतील तर त्यामध्ये उकळलेले 1/2 वाटी पाणी घाला अन्यथा थंड पाणी घेऊन पीठ मळून घ्या ( पीठ मळण्याची कृती साठी सोबतचे व्हिडीओ पहा ). पीठ मळून झाल्यानंतर त्याचे 2 गोळे करा व  परातीमध्ये थापून गोल आकार करून घ्या थापताना उरलेल्या पिठातील थोडे पीठ परातीत पसरा व त्यावर भाकरी थापा. भाकरी पातळ व गोल करा भाकरी तयार झालेवर तवा गॅस वर ठेऊन गरम करा व त्यावर भाकरी टाका व थोड्या वेळाने पाणी लावून घ्या व भाकरी पलटून दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घ्या. ( भाकरी भाजण्याच्या कृतीसाठी व्हिडीओ पहा ) व भाकरी पुन्हा पलटून भाजा चांगली भाजल्यानंतर भाकरी तयार होते. 


      यापुढे मी आपल्याला भाकरी चुलीवरती कशी बनवतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते पाहण्यासाठी माझे युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.


 धन्यवाद !
August 5, 2016

शुभंकरोती कल्याणम व स्वामी समर्थं जप


शुभंकरोती कल्याणम व स्वामी समर्थं जप करताना वेदांत पाटीलशुभंकरोती कल्याणम आरोग्य धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दिपकजोति नमः स्तुते ।।


श्री स्वामी समर्थं १०८ वेळा जप करताना कु. वेदांत पाटील वय २ वर्ष ६ महिने.

   हे पाहून आपल्याला नवल वाटणे सहाजिकच आहे . आई - वडिलांचे अनुकरण लहान मुले करत असतात असे म्हणतात हे सत्य आहे. आपण हे व्हिडीओ पहिले तर आपल्या हे ध्यानात येईल. ज्या घरामध्ये चांगले बॊलले, पहिले, ऐकले जाते. त्या घरातील मुलांवर वेगळे संस्कार करावे लागत नाहीत. ज्या घरामध्ये आजी - आजोबा असतात त्या मुलांना नाते समजते त्याचप्रमाणे मुलांना कोणतेही वेगळे संस्कार वर्ग लावावे लागत नाहीत. आपण आपल्या आई - वडिलांना योग्य पद्धतीने सांभाळल्यास आपल्या मुलांना आपल्याला सांभाळन्यास सांगावे लागणार नाही.
              मला वाटते आपल्या भारतामध्ये असलेल्या चालीरीती, सणवार, परंपरा या गोष्टी याकरिताच अस्तित्वात असाव्यात. सध्या आपण त्यांच्यामागील शास्रीय कारणे शोधण्यामागे धावतोय पण यामुळे आपले काय नुकसान होत आहे हे कोणी पाहताना दिसत नाही.
           अशा काही छुल्लक कारणामुळे आपल्याला आज संस्कार वर्गांची गरज भासू लागली आहे. आज आपल्याला वेळ नाही मुलांच्या आईलाही नोकरी करावी लागते. घरामध्ये आई - वडिल नाहीत अन आपले पण आई - वडिल घरात नाहीत ते वेगळे किंव्हा वृद्धाश्रमात आहेत. मग आपल्या मुलांवर कोण सुसंस्कार करणार.
                आपण आज जे काही मिळतोय किंव्हा करतोय ते शेवटी कोणासाठी ? हा एक प्रश्न स्वतःला विचारून पहा. मग आपल्या मुलांचे व आई - वडिलांचे संगोपन कसे करावे हे आपणास कळेल.
               आता एवढेच पुरे सांगण्यासारखे बरेच काही आहे. पण ऐकतो कोण वाचले लाईक केले संपले सर्व उद्या येरे माझ्या मागल्या.
             आपण माझे विचार वाचले त्याबद्दल धन्यवाद ! यावर विचार करा अमलात आणून पहा व अनुभव आपला मला कळवा.

                  फक्त लाईक करू नका शेअर करा व मला आपल्या प्रतिक्रिया कळवा.युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.
धन्यवाद !June 24, 2016

इयत्ता सहावी सेमी इंग्लिश वर्गाच्या मराठी विषयातील धडा २रा ( सायकल म्हणते मि आहे ना ! ) जून २०१६ नवीन अभ्यासक्रम

Sixth Standard semi English New syllabus 2016 Subject Marathi chapter 2nd (cycle mhante mi ahe na!)


    धडा २रा सायकल म्हणते मि आहे ना ! आपल्या पाल्याला समजावून देताना शिवजी पाटील.
     आपण आपल्या पाल्याला शाळे व्यतिरिक्त घरच्या घरी शिकवा त्यामुळे त्याचा विकास होईल त्याच्या गरजा समजावून घ्या त्याच्यावर संस्कार करा ही पालकांची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी क्लास किंव्हा इतरत्र पाठवून झटकू नका. आपल्या एवढे आपल्या मुलाला कोणीही समजावून घेऊ शकत नाही हे विसरू नका.
               मी माझ्या पाल्याला शाळेतून घरी आल्यानंतर घरीच शिकवतो त्यालाही मी शिकवलेले समजते. माझी व्हिडिओ पहा आपल्या लक्षात येईल.
           मी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शिराळा भागातील असलेमुळे त्या भागातील भाषेचा वापर होतो समजून घ्या.युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.

June 23, 2016

इयत्ता सहावी सेमी इंग्लिश वर्गाच्या मराठी विषयातील पहिले समूह गीत " बलसागर भारत होवो !" जून २०१६ नवीन अभ्यासक्रम

Sixth Standard semi English New syllabus 2016 Subject Marathi chapter 1st ( balsagar bharat hovo)

  पहिले समूह गीत साने गुरुजींच्या "स्पूर्तिगिते" या पुस्तक  संग्रहतून घेतलेल्या " बलसागर भारत होवो !" हे समूह गीत माझ्या पाल्याला समजावून  देताना शिवजी पाटील.
    आपण आपल्या पाल्याला शाळे व्यतिरिक्त घरच्या घरी शिकवा त्यामुळे त्याचा विकास होईल त्याच्या गरजा समजावून घ्या त्याच्यावर संस्कार करा ही पालकांची जबाबदारी आहे. आपली जबाबदारी क्लास किंव्हा इतरत्र पाठवून झटकू नका. आपल्या एवढे आपल्या मुलाला कोणीही समजावून घेऊ शकत नाही हे विसरू नका.
     मी माझ्या पाल्याला शाळेतून घरी आल्यानंतर  घरीच शिकवतो त्यालाही मी शिकवलेले समजते. माझी व्हिडिओ पहा आपल्या लक्षात येईल.
     मी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शिराळा भागातील असलेमुळे त्या भागातील भाषेचा वापर होतो समजून घ्या.
  


युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.

June 21, 2016

महाराष्ट्र राज्यातील भात पेरणी भाग 1

     भारतातील महाराष्ट्र राज्यातील पूर्व कोकण भाग सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी कशी करतात?  केव्हा करतात ? 

  शेतकरी मार्च ते मे महिन्यादरम्यान जमिनीची मशागत करतात . प्रथम जमिनीची नांगरट केली जाते खुरट, रोटाव्हेटरने जमीनीतील ढेकळं फोडतात जमिनीतील काडी कचरा गोळा करून जाळला जातो. कुळव- पाट्याच्या पाळ्या  दिल्या  जातात व जमीन भुसभुशीत केली जाते. जमिनीमधे शेणखत टाकले जाते सर्वसाधारण मे महिन्याच्या अखेर पर्यत ही कामे चालतात २३ किव्हा २४ मे रोहिण्यर्क नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडणेच्या  आगोदर भात पेरणीला सुरुवात केली जाते. यालाच धूळवाफ पेरणी म्हणतात. 
         पेरणीकरिता वापरले जाणाऱ्या अवजाराल कुरी / पाबर असे म्हणतात. त्याची दुरुस्ती डागडुजी शेतकरी अगोदरच करून ठेवतो .

       
   कुरीचे मुख्य भाग १) चाडे २) नळे ३) दिंड ४) फण ५) दांड्या हे होय. 

        १) चाडे - याला एका बाजूला नळे बसवण्याची सोय असते दुसरीकडे बी टाकण्यासाठी खोलगट भाग असतो. चाड्याला सहा होल असतात. 

           २) नळे - नळे दोन ते तीन फूट लांबीचे पिव्हीसी पाईप किंव्हा बांबूपासून बनवलेले असतात.
       
     ३) दिंड - दिंड हे बाभळीच्या लाकडापासून बनवले जाते सर्वसाधारण ७ ते ८ इंचाचा व ४० इंच लांबिच्या  लाकडी टोकला घेऊन त्यापासून कुरीचे दिंड सुतार तासून तयार करतात 


        युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.