महाराष्ट्र राज्यातील भात पेरणी भाग 1

     भारतातील महाराष्ट्र राज्यातील पूर्व कोकण भाग सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी कशी करतात?  केव्हा करतात ? 


         शेतकरी मार्च ते मे महिन्यादरम्यान जमिनीची मशागत करतात . प्रथम जमिनीची नांगरट केली जाते खुरट, रोटाव्हेटरने जमीनीतील ढेकळं फोडतात जमिनीतील काडी कचरा गोळा करून जाळला जातो. कुळव- पाट्याच्या पाळ्या  दिल्या  जातात व जमीन भुसभुशीत केली जाते. जमिनीमधे शेणखत टाकले जाते सर्वसाधारण मे महिन्याच्या अखेर पर्यत ही कामे चालतात २३ किव्हा २४ मे रोहिण्यर्क नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडणेच्या  आगोदर भात पेरणीला सुरुवात केली जाते. यालाच धूळवाफ पेरणी म्हणतात. 

         पेरणीकरिता वापरले जाणाऱ्या अवजाराल कुरी / पाबर असे म्हणतात. त्याची दुरुस्ती डागडुजी शेतकरी अगोदरच करून ठेवतो .


       
   कुरीचे मुख्य भाग १) चाडे २) नळे ३) दिंड ४) फण ५) दांड्या हे होय. 


        १) चाडे - याला एका बाजूला नळे बसवण्याची सोय असते दुसरीकडे बी टाकण्यासाठी खोलगट भाग असतो. चाड्याला सहा होल असतात. 


          २) नळे - नळे दोन ते तीन फूट लांबीचे पिव्हीसी पाईप किंव्हा बांबूपासून बनवलेले असतात.
       
      ३) दिंड - दिंड हे बाभळीच्या लाकडापासून बनवले जाते सर्वसाधारण ७ ते ८ इंचाचा व ४० इंच लांबिच्या  लाकडी टोकला घेऊन त्यापासून कुरीचे दिंड सुतार तासून तयार करतात 


        युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.

No comments:

Post a Comment