शुभंकरोती कल्याणम व स्वामी समर्थं जप


शुभंकरोती कल्याणम आरोग्य धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दिपकजोति नमः स्तुते ।।


श्री स्वामी समर्थं १०८ वेळा जप करताना कु. वेदांत पाटील वय २ वर्ष ६ महिने.

   हे पाहून आपल्याला नवल वाटणे सहाजिकच आहे . आई - वडिलांचे अनुकरण लहान मुले करत असतात असे म्हणतात हे सत्य आहे. आपण हे व्हिडीओ पहिले तर आपल्या हे ध्यानात येईल. ज्या घरामध्ये चांगले बॊलले, पहिले, ऐकले जाते. त्या घरातील मुलांवर वेगळे संस्कार करावे लागत नाहीत. ज्या घरामध्ये आजी - आजोबा असतात त्या मुलांना नाते समजते त्याचप्रमाणे मुलांना कोणतेही वेगळे संस्कार वर्ग लावावे लागत नाहीत. आपण आपल्या आई - वडिलांना योग्य पद्धतीने सांभाळल्यास आपल्या मुलांना आपल्याला सांभाळन्यास सांगावे लागणार नाही.
              मला वाटते आपल्या भारतामध्ये असलेल्या चालीरीती, सणवार, परंपरा या गोष्टी याकरिताच अस्तित्वात असाव्यात. सध्या आपण त्यांच्यामागील शास्रीय कारणे शोधण्यामागे धावतोय पण यामुळे आपले काय नुकसान होत आहे हे कोणी पाहताना दिसत नाही.
           अशा काही छुल्लक कारणामुळे आपल्याला आज संस्कार वर्गांची गरज भासू लागली आहे. आज आपल्याला वेळ नाही मुलांच्या आईलाही नोकरी करावी लागते. घरामध्ये आई - वडिल नाहीत अन आपले पण आई - वडिल घरात नाहीत ते वेगळे किंव्हा वृद्धाश्रमात आहेत. मग आपल्या मुलांवर कोण सुसंस्कार करणार.
                आपण आज जे काही मिळतोय किंव्हा करतोय ते शेवटी कोणासाठी ? हा एक प्रश्न स्वतःला विचारून पहा. मग आपल्या मुलांचे व आई - वडिलांचे संगोपन कसे करावे हे आपणास कळेल.
               आता एवढेच पुरे सांगण्यासारखे बरेच काही आहे. पण ऐकतो कोण वाचले लाईक केले संपले सर्व उद्या येरे माझ्या मागल्या.
             आपण माझे विचार वाचले त्याबद्दल धन्यवाद ! यावर विचार करा अमलात आणून पहा व अनुभव आपला मला कळवा.

                  फक्त लाईक करू नका शेअर करा व मला आपल्या प्रतिक्रिया कळवा.युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.
धन्यवाद !

 
No comments:

Post a Comment