महाराष्ट्र राज्यातील भात पेरणी भाग 2

  भारतातील महाराष्ट्र राज्यातील पूर्व कोकण भाग सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये धूळवाफ पद्धतीने भात पेरणी करतात त्यानंतर त्याला पाणी देण्याच्या पद्धती .


  धूळवाफ भाताची पेरणी झालेनंतर पाऊस लवकर किंव्हा पुरेसा न पडल्यास त्या जमिनीला पाणी देणे भाग पडते. अन्यथा बी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाताला पाणी देण्याच्या तीन पद्धती याठिकाणी वापरल्या आहेत.                             
१) पाणी वाफ्यात सोडून देऊन.                             
२) स्पिंकलर चा वापर करून.                              
३) ठिबक सिंचन चा वापर .                                             
       आम्ही प्रथम पाणी वाफ्यामध्ये सोडून पहिले मात्र यामध्ये असे आढळून आले कि पाणी ज्यास्त प्रमाणात उपलब्ध असायला हवे. त्याचप्रमाणे पाणी पाजताना जमिनीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरत नाही. वाफे पाण्याने भरण्याकरता पाणी ज्यास्त प्रमाणात हवे. तेवढे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध होत नाही. व पाणी जमिनीवर छोटे छोटे पाठ काढून पाजावे लागते. त्यामुळे भात वर येण्याची व गोळा होण्याची शक्यता असते . 
         मग त्यावर पर्याय म्हणून आम्ही स्पिंकलर वापरून पहिले त्याकरिताही पाणी थोडे ज्यास्तच लागते.  म्हणून शेवटी आम्ही ठिबक वापरले त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे झालेला आम्हाला जाणवला आहे .  ठिबकच्या पाईप १ फूट अंतरावर लावल्या आहेत. 
            भात उगवण्यासाठी ४ते ५ इंच खोल जमिनीला ओल पोहचणे आवश्यक असते . १ एकर शेतामध्ये ठिबक लावल्यास ५ एच. पी. मोटर ८ ते १० तास चालवल्यास पुरेशी ओल होते. 
                वरील ठिबक पद्धतीने भाताला पाणी देऊन पहा मला आपल्या प्रतिक्रया कळवा. 

युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.

धन्यवाद !

 

No comments:

Post a Comment