महाराष्ट्रातील फेमस भाकरी बवण्याची सोपी पद्धत

घरच्या घरी ज्वारी, बाजरी, मक्का, तांदूळ यांची भाकरी कशी बनवतात ते आता आपण पाहू.

 


  2 भाकरी करण्यासाठी साहित्य
 १) ज्वारी, बाजरी, मक्का, तांदूळ यापैकी एकाचे बारीक दळलेले पीठ ३ वाट्या
 २) गरम पाणी (उत्तवण्यासाटी )
 ३) थंड पाणी एका भांड्यतून
 ४) परात
 ५) तवा इ.

 कृती :-
  प्रथम परातीमध्ये 2 वाट्या पीठ घ्या. पीठ दळून आणून फार दिवस झाले असतील तर त्यामध्ये उकळलेले 1/2 वाटी पाणी घाला अन्यथा थंड पाणी घेऊन पीठ मळून घ्या ( पीठ मळण्याची कृती साठी सोबतचे व्हिडीओ पहा ). पीठ मळून झाल्यानंतर त्याचे 2 गोळे करा व  परातीमध्ये थापून गोल आकार करून घ्या थापताना उरलेल्या पिठातील थोडे पीठ परातीत पसरा व त्यावर भाकरी थापा. भाकरी पातळ व गोल करा भाकरी तयार झालेवर तवा गॅस वर ठेऊन गरम करा व त्यावर भाकरी टाका व थोड्या वेळाने पाणी लावून घ्या व भाकरी पलटून दुसऱ्या बाजूने चांगली भाजून घ्या. ( भाकरी भाजण्याच्या कृतीसाठी व्हिडीओ पहा ) व भाकरी पुन्हा पलटून भाजा चांगली भाजल्यानंतर भाकरी तयार होते. 


      यापुढे मी आपल्याला भाकरी चुलीवरती कशी बनवतात हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते पाहण्यासाठी माझे युट्युब वरील KG2PGEduAll हे चॅनेल सबस्क्राईब करा.


 धन्यवाद !

No comments:

Post a Comment