तांदळाचे उक्कड कानवले बनवने.

तांदळाचे उक्कड कानवले बनवने  

                                                             

    तांदळाचे उक्कड कानवले कसे बनवतात ते पाहू.      
   साहित्य :-
               १) तांदळाचे बारीक पीठ ४ वाट्या.
               २) ओल्या खोबऱ्याचा खिस २ वाट्या. 
               ३) साखर १ वाटी. 
               ४) १ चमचा मीठ. 
               ५) वेलदोडे ४,५ बारीक करून.
               ६) सुंठ पावडर १ चमचा.
               ७) तूप १ चमचा.
               ८) तेल १ चमचा.
               ९) दोन लीटर पाणी.
              १०) परात, कढई, उक्कड चाळन, पातेले इ.


कृती :-

प्रथम सारण तयार करू गॅसवर कढई ठेऊन त्यामध्ये एक चमचा तुप टाका व नंतर खोबऱ्याचा खिस घालून चांगले परतून घ्या. रंग बदलायला सुरूवात झालेनंतर त्यामधे एक वाटी साखर, मीठ व वेलदोडा, सुंठ पावडर टाकुन घ्या. चांगले एकजीव करा व गॅसवरून खाली उतरवा. हे कानवलेमध्ये भरण्यासाठी सारण तयार झाले.

आता कानवले बनवण्यासाठी पिठ तयार करण्याची पध्दत. प्रथम एक तांब्या ६०० मिली अंदाजे पाणी एका पातेल्यामधे ऊकळावे त्यामधे तांदळाचे पीठ घालून पळीने हालवत रहा त्यामधे गुटळ्या होऊ देवू नयेत. पीठ घट्ट होत आलेनंतर त्यावरती झाकन ठेवून ५ मिनीट वाफ द्या. नंतर पसरट भांड्यामधे थोडे थोडे शिजवलेले पिठ घेऊन हातााला थोडे तेल लावून पिठ चांगले मळून घ्या.
(आधिक माहीतीकरीता हे व्हिडीओ पहा) पिठ मळून झालेनंतर त्याच्या छोट्या गोळया करून हातावरती पसरवा व्हिडीओमधे दाखवल्या प्रमाणे व त्यामधे बनवलेले सारन भरून बंद करा. अश्या पध्दतीने कानवले बनवून घ्या.

नंतर ऊक्कड चाळन बसणा-या पातेल्यामधे पाणी ऊकळत ठेवा व चाळनीमधे बनवलेले कानवले ऊकडत ठेवा ऊक्कडल्यानंतर काढुन घ्या.हाा पदार्थ एक दिवसापेक्षा ज्यास्त वेळ टिकत नाही. आपल्या आवश्यकतेनुसार बनवा.


वयस्कर व दात नसलेल्या विक्ती व ज्यांना मेदाचा त्रास आहे. अशा व्यक्तीना लाभदायक पचनास हलका आहे.


आवश्य करून पहा.


युटूब वरील KG2PGEduAll चॅनल सबस्क्रायब करा.

धन्यवाद!

No comments:

Post a Comment